मुंबई

विहिरीत पडलेल्या चौशिंगा हरणाला जीवदान

CD

विहिरीत पडलेल्या चौशिंगा हरणाला जीवदान
सीस्केप व वन विभागातर्फे बचावकार्य
महाड, ता. ३०( बातमीदार) : महाड तालुक्यातील शिरगाव येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ चौशिंगा हरणाची सीस्केप संस्था आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी सुटका करण्यात आली.
शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सचिन मोहिते यांच्या सुमारे ३० फूट खोल विहिरीत चौशिंगा पडलेला आढळून आला. याची माहिती मिळताच वन विभाग आणि सीस्केप संस्थेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वनरक्षक अंगद भोसले, अजिनाथ कंठाले, आदित्य भोसले तसेच सीस्केपचे चिराग मेथा, प्रणव पालकर आदी सदस्यांनी रॅपलिंग तंत्राचा वापर करून विशेष बचाव मोहीम राबवली. अत्यंत काळजीपूर्वक चौशिंग्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर हरिण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनक्षेत्रपाल आशिष पाटील आणि वनपाल संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
.........
फोटो - विहिरीत पडलेला चौशिंगा

चौशिंगाला बाहेर काढल्यानंतर सिस्केप सदस्य व वनविभाग कर्मचारी

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

SCROLL FOR NEXT