मुंबई

ग्रामीण भागातील शाळा संकटात

CD

ग्रामीण भागातील शाळा संकटात
शासन निर्णयामुळे वाकी शाळा बंद, तर मांडले शाळा धोक्यात
महाड, ता. ३ (बातमीदार) : विद्यार्थ्यांची पटसंख्या व संच मान्यतेबाबत राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचा परिणाम ग्रामीण भागातील शाळांवर होऊ लागला आहे. ऐन परीक्षेच्या हंगामामध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने माध्यमिक शाळादेखील संकटात सापडल्या आहेत. शिक्षकांअभावी तालुक्यातील वाकी माध्यमिक शाळा बंद झाली असून मांडले शाळेचे भवितव्यदेखील धोक्यात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी शासनाने शिक्षण हमी कायदा लागू केला असला, तरी नव्या पटसंख्या व संच मान्यतेच्या नियमांमुळे ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांवर संकट ओढवले आहे. १५ मार्च २०२४ पासून लागू केलेल्या निकषांनुसार वर्गासाठी किमान २०, तर नववी-दहावीकरिता ३० विद्यार्थी बंधनकारक करण्यात आले आहेत.
या निर्णयाचा फटका दुर्गम भागातील शाळांना बसत असून, रायगड जिल्ह्यात अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कमी पटसंख्येमुळे शिक्षकांच्या बदल्या केल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील वाकी येथील गुरुदेव माध्यमिक शाळा शिक्षकाअभावी बंद पडली आहे. तसेच मांडले येथील शाळेत ९१ विद्यार्थी असूनही फक्त दोन शिक्षक उरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.

चौकट
विद्यार्थ्यांची गळती होणार
पटसंख्या निकषांमुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थी सध्या दूरवरून पायी शाळेत येत असतात. मात्र, शाळा बंद झाल्यानंतर आठ ते दहा किलोमीटर परिसरात पर्यायी शाळा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलांबरोबरच मुलींची गळती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, शिक्षणाचा हक्क धोक्यात आला आहे.

चौकट
मुख्याध्यापक व अन्य पदांवर होणार परिणाम
शाळेतील पटसंख्या व संच मान्यतेनुसार शाळेमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, लिपिक शिपाई या पदांची नवीन भरती बंद होणार आहे. शाळेमध्ये लिपिक व शिपाई ही पदे न राहिल्यास शिक्षकांना ही कामे करावी लागणार आहेत.
.....
आमच्या शाळेतील अनेक मुले आदिवासी व शेतकरीवर्गातील आहेत. पालक व शाळांकरिता हे निकष घातक असल्याने ते तातडीने बदलावेत तसेच दुर्गम भागातील शाळांकरिता विशेष नियम लागू करावे अन्यथा या भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील.
- अनंत कदम (शाळा समिती अध्यक्ष कोएसो माध्यमिक विद्यालय, मांडले)
......
फोटो - मांडले शाळा व विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT