मुंबई

चवदार तळ्यातील गाळ काढण्याच्या कामाकरता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर

CD

चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी एक कोटींचा निधी मंजूर
सत्याग्रह शताब्दीनिमित्त सुशोभीकरणावर भर
महाड, ता. ९ (बातमीदार) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाण्याचा उपसा करून त्यातील गाळ काढण्याकरिता राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून एक कोटींच्या निधीला विशेष मंजुरी दिली आहे. २० मार्च २०२७ला चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तलाव परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
२०२१ च्या महापुरानंतर महाड नगर परिषदेने तळ्यातील गाळ काढला होता. मात्र, आता पाच वर्षांनी पुन्हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. चवदार तळ्यातील पाणी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन टेक्नॉलॉजी वापरून शुद्ध ठेवले जाते. ही प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आणि तळ्यातील जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याचा उपसा करून साचलेला गाळ काढावा लागणार आहे. याकरिता सामाजिक न्याय विभागाने बुधवारी (ता. ८) ९९ लाख ८५ हजार ८०७ रुपयांच्या निधीला विशेष मंजुरी दिली आहे. हे सर्व काम महाड नगर परिषदेकडून केले जाणार आहे. चवदार तळ्यातील पाण्याचा उपसा केल्यानंतर तळ्याच्या परिसरात असलेल्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी होत असते, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे हे काम करताना परिसरातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाचाही विचार नगरपालिकेला करावा लागणार आहे.

शंभर वर्षे पूर्ण होणार
महाड येथील चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ला चवदार पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात लढा दिला होता. यामुळे चवदार तळे जागतिक नकाशावर आले आहे. अशा या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी देशभरातून डॉ. आंबेडकरांचे हजारो अनुयायी येत असतात. याशिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत असते. वर्षभरात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्य सरकारकडून चवदार तळे परिसर व सुशोभीकरणासाठी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT