मुंबई

महाड ग्रामीण रुग्णालयाला ओलाॅन कंपनीने दिला मदतीचा हात

CD

महाड ग्रामीण रुग्णालयाला ओलाॅन कंपनीने दिला मदतीचा हात
अत्याधुनिक साधनसामग्रीचे लोकार्पण
महाड, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामीण रुग्णांना आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाड येथील ग्रामीण रुग्णालयाला ओलॉन इंडिया प्रा. लि. कंपनीकडून अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्रीचा मदतीचा हात देण्यात आला. या साहित्याचे लोकार्पण मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात आले.
राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या साहित्याचे उद्‍घाटन झाले. यावेळी कंपनीचे उपसंचालक ख्रिस्तीयानो कॅप्रिऑत्ती, कंट्री हेड नटवर पांचाल, साईट हेड इंद्रजीत वाडकर, कंपनी हेड प्रशांत गीते, वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत म्हामुणकर, सिव्हिल सर्जन डॉ. नीलकंठ पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनू डोईफोडे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक आदी उपस्थित होते.
महाड ग्रामीण रुग्णालयात तालुका व परिसरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. ट्रॉमा केअर युनिट असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र, अत्यावश्यक आणि आधुनिक वैद्यकीय साधनांच्या अभावामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन ओलॉन कंपनीने रुग्णालयाच्या गरजांचा अभ्यास करून आपल्या सीएसआर निधीतून आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. यात डीफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन, लॅप्रोस्कोपी सेट, व्हिडिओ लॅरिंगोस्कोपसह सुमारे २५ प्रकारची अत्याधुनिक उपकरणे देण्यात आली आहेत.

.........
फोटो - वैद्यकीय साधनसामग्रीचे लोकार्पण करताना मंत्री भरत गोगावले सोबत कंपनीचे ख्रिस्तीयानो कॅप्रिऑत्ती व इतर

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT