मुंबई

डम्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

डम्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाड, ता. १० (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत महाड शहरात शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डम्परचालकाविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष देऊ शिंदे (वय ५५, रा. किंजळोली बुद्रुक, ता. महाड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून महाडकडे जात असताना दोसी पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडवर मागून येणाऱ्या डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर शिंदे हे रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी डम्परचे पुढील चाक त्यांच्या शरीरावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि शिंदेंना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र गंभीर दुखापतीमुळे शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात डम्परचालक एम. डी. जहांगीर गुलाम मुस्तफा याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT