मुंबई

हळदी समारंभाच्या वादातून लोखंडी सळईने हल्ला

CD

हळदी समारंभाच्या वादातून लोखंडी सळईने हल्ला; एक जखमी
महाड, ता. १५ (बातमीदार) : हळदी समारंभात झालेल्या शाब्दिक वादातून तरुणावर लोखंडी सळईने हल्ला झाल्याची घटना महाड तालुक्यातील कुंभेशिवथर येथे घडली. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कुंभेशिवथर बसस्टॉप परिसरात ही घटना घडली. विनोद पांडुरंग साळुंखे (रा. कुंभेशिवथर) हे जखमी झाले असून, याबाबत दत्ता विलास मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
हळदी कार्यक्रमात जखमी विनोद आणि अल्पेश जाधव यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर अल्पेश जाधव याने ही बाब त्याचे मामा दिलीप साळुंखे यांना सांगितली. त्यातून रागाच्या भरात दिलीप साळुंखे यांनी टोकदार लोखंडी सळईने विनोद साळुंखे यांच्या डाव्या कुशीवर आणि हातावर वार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक फडतरे करीत आहेत.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT