मुंबई

बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन

CD

बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन
गणेशोत्सवानिमित्त नागरिकांकडून खरेदीला पसंती
महाड, ता. १६ (बातमीदार) : गणेशोत्सवानिमित्त उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती महाड अंतर्गत रणरागिणी आदर्श महिला प्रभागसंघ, खरवली-वरंध यांच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाचे उद्‍घाटन तालुका अभियान व्यवस्थापक संचित पार्टे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्रीमूर्ती, पूजा साहित्य, विविध प्रकारचे मोदक, चहा-मसाले, मोदक व इतर पीठ, कटलरी, पौष्टिक बिस्कीट आदी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी स्वतःच्या कौशल्यातून आणि मेहनतीतून तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे बचत गटातील महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळत आहे. तसेच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या वाटचालीलाही बळ मिळत आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बचत व कर्जापुरते मर्यादित न ठेवता उत्पादन, व्यवसाय आणि बाजारपेठेच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांकडून होणारी खरेदी ही ग्रामीण महिलांच्या कष्टांना आणि कौशल्याला प्रोत्साहन देणारी ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या वेळी प्रभाग समन्वयक दर्शना श्रीवर्धनकर, प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली धाडवे, प्रभाग व्यवस्थापक नेहा सकपाळ, प्रतीक्षा पवार, विविध ग्रामसखी आणि महिला सदस्य उपस्थित होत्या.

महिलांना बाजारपेठेची संधी
उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला. बचत गटांच्या महिलांना केवळ बचत आणि कर्जाच्या व्यवहारापुरते मर्यादित न ठेवता उत्पादन, विक्री आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यावर भर देण्यात आला. त्यामुळे महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे.
.......
फोटो- स्टॉलचे उद्घाटन करताना_

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT