मुंबई

पहिला दिवा महाराजांच्या चरणी,353 मशालींच्या प्रकाशात उजळला दुर्गराज रायगड

CD

पहिला दिवा महाराजांच्या चरणी
३५३ मशालींच्या प्रकाशात उजळला रायगड
महाड, ता. ७ (बातमीदार) : दुर्गराज रायगड शुक्रवारी रात्री शेकडो शिवभक्तांनी प्रज्वलित केलेल्या मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. एक अनोखा शिवचैतन्य सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकाला या वर्षी ३५३ वर्षे झाली आणि तेवढ्या मशाली रायगडावर समितीतर्फे प्रज्वलित करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
सोहळ्याची सुरुवात गडदेवता श्री शिरकाई देवीच्या पूजनाने झाली. जगदीश्वर मंदिर, व्याडेश्वर मंदिर, भवानी टोक, महादरवाजा, राजसदर या सर्व ठिकाणी पूजा करण्यात आली. या सर्व परिसरात आकर्षक रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंना दिवाळीच्या उत्सवाचे आगळेवेगळे रूप प्राप्त झाले. होळीचा माळ, बाजारपेठ आणि राजसदर परिसरात शिवभक्तांनी पणत्या लावून रांगोळी काढून दिवाळीचा आनंद उत्साहात साजरा केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, त्यांच्या हातातील प्रज्वलित मशाली आणि सातत्याने सुरू असलेला शिव जयघोष यामुळे रायगडावरील वातावरण भारावून गेले.
या वेळी समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी दिवाळी सणादरम्यान अंधारात असणे ही प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला वेदना देणारी बाब आहे. याच भावनेतून शिवचैतन्य सोहळ्याची सुरुवात झाली. स्वराज्याची राजधानी दिवाळी सणात अंधारात राहू नये, प्रकाशमान राहावी, यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. यासाठी समिती सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
--------------------
फोटो - मशालीने उजळला रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT