महाड, ता. ११ (बातमीदार) : रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे क्रमांक तसेच प्रवर्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित गाड्यांचे जुने क्रमांक बदलून नवीन क्रमांक देण्यात येणार असून, काही गाड्यांचे सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस असे वर्गीकरणही बदलण्यात येणार आहे. हे बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस या गाडीचे रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार सुपरफास्ट श्रेणीतून एक्स्प्रेस श्रेणीत रूपांतर करण्यात आले आहे. गाडी क्रमांक २२११३ आणि २२११४ ऐवजी अनुक्रमे ११०७३ आणि ११०७४ असे नवीन क्रमांक असतील. चार रथ आणि पाच जानेवारीपासून या गाड्या नव्या क्रमांकाने धावतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी एक्स्प्रेस क्रमांक २२११५ आणि २२११६ ऐवजी आता अनुक्रमे ११०५३ आणि ११०५४ हे नवीन क्रमांक असतील. ७ जानेवारी २०२७ पासून नवीन क्रमांक लागू होतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्स्प्रेस ही पूर्वी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणारी ही गाडी आता एक्स्प्रेस श्रेणीत धावणार आहे. जुने क्रमांक २२२०१ आणि २२२०२ ऐवजी अनुक्रमे १६३७१ आणि १६३७२ हे नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. ही गाडी २ आणि ३ जानेवारी २०२७ पासून नव्या क्रमांकाने धावेल.
वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा जुने क्रमांक १२७७९ आणि १२७८० ऐवजी आता अनुक्रमे १७३७९ आणि १७३८० हे नवीन क्रमांक असून, १ जानेवारी २०२७ पासून नवे क्रमांक लागू होतील.
मडगाव जंक्शन आणि मंगळूर सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचे क्रमांकही बदलण्यात आले आहेत. जुने क्रमांक ५६६१५ आणि ५६६१६ ऐवजी अनुक्रमे ५६२१६ आणि ५६२१५ असे नवीन क्रमांक असून, ते १ जानेवारी २०२७ पासून लागू होतील.
दक्षिण मध्य रेल्वेने काचेगुडा-कुंमटा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या क्रमांकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे जुने क्रमांक १२७८९ आणि १२७९० ऐवजी आता अनुक्रमे १७६८९ आणि १७६९० असे नवीन क्रमांक असतील. या गाडी क्रमांक १७६९०चे आरक्षण ११ नोव्हेंबरपासून पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू झाले आहे. ही गाडी १ आणि २ जानेवारी २०२७पासून नवीन क्रमांक व वेळापत्रकानुसार धावेल.
प्रवाशांना फायदा होणार
दरम्यान, सुपरफास्ट श्रेणीतून एक्स्प्रेस श्रेणीत रूपांतरित करण्यात आलेल्या गाड्यांसाठी आता सुपरफास्ट अधिभार (सुपरफास्ट सरचार्ज) आकारला जाणार नाही. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.