Sanjay Raut Esakal
मुंबई

Sanjay Raut : संजय राऊत यांच्याविरोधातील वॉरंट रद्द

दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत वारंवार गैरहजर राहिले आहेत, असा ठपका ठेवून न्यायालयाने त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज अजामीनपात्र वॉरंट बजावले होते; परंतु राऊत यांनी दुपारी न्यायालयात हजेरी लावल्याने न्यायालयाने वॉरंट रद्दबातल केले.

दरम्यान, दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत वारंवार गैरहजर राहिले आहेत, असा ठपका ठेवून न्यायालयाने त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी न्यायालयाने मेधा यांचा जबाब नोंदवला आणि पुढील सुनावणी २४ जानेवारीला निश्चित केली;

मात्र काही वेळातच राऊत यांनी न्यायालयात हजेरी लावली. त्यामुळे दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी वॉरंट रद्दबातल केले. न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या छाननीनंतर सोमय्या यांच्या आरोपात तथ्य दिसते, असे मत यापूर्वी न्यायालयाने व्यक्त केले आहे.

राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले होते. तसेच समाजमाध्यमावरदेखील याबाबत माहिती दिली होती; मात्र या घोटाळ्याशी आमचा संबंध नाही, असा खुलासा मेधा सोमय्या यांनी केला आहे.

ईडीच्या हरकतीवर सोमवारी सुनावणी
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामिनाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच विशेष न्यायालयाने आपल्या निकालपत्रात तपासावर कडक ताशेरे ओढले आहेत. यावरदेखील ईडीने हरकत घेतली आहे.

राऊत सुमारे तीन महिने या प्रकरणात कारागृहात होते. सोमवारी (ता. ९) ईडीच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT