JOhnson and Johnson Sakal
मुंबई

‘जॉन्सन’च्या बेबी पावडरच्या उत्पादन-विक्रीचा मार्ग मोकळा

‘जॉन्सन’च्या बेबी पावडरवरील बंदी मागे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर उत्पादन-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उत्पादनावर बंदी घालण्याचा अन्न औषध प्रशासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे.

तसेच प्रशासनाने बंदी घातलेला सर्व माल स्वतःहून नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने कंपनीला दिला आहे.केंद्र सरकारने एफडीएसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यामुळे जुन्या नियमावलीनुसार दिलेले कारवाईचे आदेश न्यायालयाने रद्दबातल केले आहेत. हवे असल्यास प्रशासन नव्या नियमाने चाचणी घेऊ शकते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

ज्या मालावर प्रशासनाने बंदी घातली आहे, त्यातील एकही डबा विक्रीसाठी बाहेर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने कंपनीला दिले. कंपनीच्या बारा नमुन्यांतील केवळ दोन नमुने निकषानुसार आढळले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करायला परवानगी दिली आहे.

औषध प्रशासन विभागाने १५ सप्टेंबरपासून कंपनीचा उत्पादन परवाना आरोग्यासाठी हानीकारक या कारणामुळे रद्द करण्याचा आदेश काढला होता. तसेच पाच दिवसांनंतर एफडीए आयुक्तांनी या आदेशाची फेरदुरुस्ती करून कंपनीने तात्काळ मुलुंड येथील प्रकल्पात सुरू असलेले बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश काढले.

या आदेशाला अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसमोर कंपनीकडून आव्हान देण्यात आले होते; मात्र त्यांनी सुनावणीनंतर हे अपील फेटाळले. त्यामुळे कंपनीने एफडीएच्या परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात याचिकेवर आव्हान दिले. या उत्पादनात प्रमाणाबाहेर असलेले जीवाणू कमी करण्यासाठी आरोग्यास हानीकारक अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याचा आरोप करून त्यांचा सर्व प्रसाधन उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला होता.

कारवाईला दोन वर्षे का?
न्या. गौतम पटेल आणि न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या पद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जर नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रशासनाने पावडरचे नमुने घेतले होते, तर मग कारवाई करण्यात दोन वर्षे का घेतली, असे खंडपीठाने सुनावले होते. सरकारने ग्राहकांच्या दृष्टीने यावर विचार करायला हवा होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT