मुंबई

आयुक्त चहल सोमवारी ईडी कार्यालयात?

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले आहे. आतापर्यंत ईडीचे समन्स स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आयुक्त चहल यांनी आपले मौन सोडले असून आपण ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चहल सोमवारी ईडी कार्यालयात हजर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात मुंबईतील कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत ठाकरे सरकारने घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन आयुक्त चहल यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात सोमय्या यांनी आझाद मैदान आणि मरिन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास आता ईडीमार्फत सुरू असून ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कोविड काळातील कामे वगळता मुंबई महापालिकेच्या इतर कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच कॅगला दिले होते. राज्य सरकारनेही रस्ते आणि इतर कामांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही दिवसांनी ईडीने आयुक्त चहल यांना समन्स बजावले. यासंदर्भात ईडीने चहल यांना १६ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे कळते.
...
नातेवाईकांना मोठी कंत्राटे
कोविडच्या काळात मुंबईत १२ हजार कोटींहून अधिक खर्चाची कामे झाली आहेत. कोविड काळात शिवसेना नेते, पालिका अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना मोठी कंत्राटे दिल्याचा आरोप होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT