मुंबई

मालवणी येथे खारफुटीवर अवैध भराव

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : एका बाजूला मुंबईतील वनसंपदा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र निसर्गावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मालवणी येथील खारफुटींवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात आहे. यामुळे खारफुटीचा मोठा पट्टा नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण विभाग तसेच मँग्रोव्हज सेलकडे तक्रार केली आहे.

मालवणी परिसरातील खाडीकिनारी खारफुटीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जैवविविधता आणि पशू-पक्ष्यांचे अस्तित्वही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असते; परंतु परिसरातील खारफुटीमध्ये भराव टाकून बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालवणी येथील खारफुटीवर सीटीएस क्र. २ शी संबंधित सर्व्हे क्र. २६३ वर मोठ्या प्रमाणात डम्पिंग होत आहे. येथील जागा मालकाकडून खारफुटीची कत्तल केली जात असून, बांधकामासाठी लोखंड आणल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला बाधा पहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. ही अतिशय गंभीर समस्या असल्याचे पिमेंटा म्हणाले.

निसर्गचक्र धोक्यात येण्याची भीती
खारफुटी परिसरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे जैवविविधतेबरोबरच इतर गोष्टींवरदेखील परिणाम जाणवतो. यामुळे स्थानिकांची मच्छीमारी धोक्यात आली आहे. विशेषत: जेव्हा संपूर्ण मासेमारी समुदाय कोस्टल रोड रिक्लेमेशन, कोस्टल वॉटरचे प्रदूषण आदींमुळे गंभीर समस्यांना तोंड देत आहे. खारफुटीमध्ये कचरा टाकल्याने नाजूक परिसंस्थेचा नाश होतो. चक्रीवादळ आणि किनारी धूप इत्यादी दरम्यान खारफुटी हे ‘बजर झोन’ म्हणून काम करतात. हे चक्रही धोक्यात येण्याचा शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

IND vs IRE 1st T20I: वैभव सूर्यवंशी पदार्पणात पाच मोठे विक्रम! पहिली धाव घेताच पराक्रम करणार; सचिनसह रोहितचा विक्रम मोडणार

SCROLL FOR NEXT