मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडून सात महिन्यात २८ कोटींची मदत

CD

मुंबई, ता. ७ : गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून गेल्या सात महिन्यांत तीन हजार ६०० रुग्णांना २८ कोटींपेक्षा अधिक मदत करण्यात आली. त्यापैकी जानेवारी महिन्यात विक्रमी ८.८९ कोटींची मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत करता यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नव्या आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
---
मदतीचा आढावा
महिना---- रुग्ण-------- मदत
जुलै १९४ ८३ लाख
ऑगस्ट २७६ १.४० कोटी
सप्टेंबर ३३६ १.९३ कोटी
ऑक्टोबर २५६ २.२१ कोटी
नोव्हेंबर ५२७ ४.५० कोटी
डिसेंबर १,०१३ ८.५२ कोटी
जानेवारी १,०६० ८.८९ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT