मुंबई

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बुधवारी शिक्षण मंडळाच्या वाशी कार्यालयावर मोर्चा

CD

मुंबई, ता. १२ : मुंबई विभागातील कनिष्ठ शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांनी बुधवारी (ता. १५) कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे १५ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता वाशी स्टेशनहून निघून मंडळ कार्यालयावर जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या वाशी कार्यालयातील कामकाज हे अत्यंत दिरंगाईने आणि शिक्षकांना त्रास होईल, अशा पद्धतीने सुरू आहे. त्यामुळेच शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा शालार्थ क्रमांक लवकर दिला जात नाही व त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळालेली असतानादेखील सहा-सहा महिने, वर्षभर शिक्षकांचे पगार सुरू होत नाहीत. अनेकदा अनुचित कारणे सांगून शालार्थ प्रस्ताव परत केले जातात. शालार्थ क्रमांक मिळाल्यावर लॉगिन देण्यासाठीसुध्दा मंडळ विलंब लावले जाते. परिणामी वेतनाला आणखी उशीर होत असल्याने त्याचा नाहक त्रास शिक्षकांना भोगावा लागत असल्याचे मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
मागील वर्षी बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे मानधन विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबर दिले नाही. याबाबत संघटनेने सहविचार सभेमध्ये मंडळ अध्यक्षांना सांगूनही त्यांनी शिक्षकांना निकालाबरोबर मानधन देण्याची मुंबई मंडळाची परंपरा मोडीत काढली. विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी ऑक्टोबर महिन्यात फी जमा केली जाते व जून महिन्यात परीक्षेचा निकाल लागतो. त्या वेळीसुद्धा हे मानधन देण्यात मंडळ टाळाटाळ केले जाते. मानधन देण्यास मुद्दामच उशीर केला जातो. त्यामुळे शालार्थसाठी पारदर्शकता व तत्परता आदी अनेक विषय महत्त्वाचे आणि आवश्यक असल्याने आम्हाला आता मोर्चा काढावा लागत असल्याचे प्रा. आंधळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT