मुंबई

एसबीआयचा डिव्हीडंड यील्ड फंड

CD

मुंबई, ता. २० : एसबीआय म्युच्युअल फंडाने एसबीआय डिव्हीडंड यील्ड फंड हा ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड बाजारात आणला आहे. यातील निधी, दरवर्षी भरघोस डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवला जाईल.

एसबीआय म्युच्युअल फंडाचे एमडी व सीईओ समशेर सिंह यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या फंडाचा एनएफओ आजपासून सहा मार्चपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. या एनएफओमध्ये किमान पाच हजार रुपये व त्यानंतर एक रुपयाच्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येईल. यातील किमान ६५ टक्के रक्कम चांगला डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये व शेअर बाजाराशी निगडित साधनांमध्ये गुंतवली जाईल; तर उरलेली ३५ टक्के रक्कम इतर कंपन्यांमध्ये व इतर शेअरशी संबंधित साधनांमध्ये गुंतवली जाईल. त्यामुळे या फंडातील गुंतवणूकदारांच्या युनिट्सच्या किमतीत वाढ तर होईलच, पण त्यांना दरवर्षी चांगला लाभांशही मिळेल, असा दुहेरी फायदा त्यांना होईल, असेही सिंह यांनी सांगितले. हा फंड बाजारात आल्यानंतर कालांतराने आम्ही या क्षेत्रातील बाजारपेठेतील सर्वात जास्त मालमत्ता असलेला फंड होऊ, असेही ते म्हणाले.‌ यावेळी नियमितपणे चांगला डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्या या खरे पाहता वर्षानुवर्षे चांगली वाढ दाखवणाऱ्या कंपन्या असतात. त्यामुळे यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे मुख्य व्यवसाय अधिकारी डीपी सिंह यांनी सांगितले.
----------
संशोधन करून गुंतवणूक
या फंडाच्या निधीतून सर्व क्षेत्रांच्या कंपन्यांमध्ये संशोधन करून गुंतवणूक केली जाईल. चांगला डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच गेल्या तीन वर्षांत एकदा आपल्या शेअरची गुंतवणूकदारांकडून पुनर्खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्येही या फंडाच्या निधीतून गुंतवणूक केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT