मुंबई

नवलखा यांच्या जामिनावर नव्याने सुनावणी घ्या!

CD

मुंबई, ता. २ : भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या जामिनावर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज विशेष एनआयए न्यायालयाला दिले.
विशेष एनआयए न्यायालयाने यापूर्वी नवलखा यांना जामीन नामंजूर केला; मात्र निकालपत्रात यूएपीए कायद्याच्या कलम ४३ ड (५) नुसार सविस्तर कारणे दिलेली नाही. जी कारणे दिली आहेत, ती अनाकलनीय आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे आणि जुना जामीन नामंजूर करण्याचा निकाल रद्दबातल केला. या जामिनावर विशेष एनआयए न्यायालयाने चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, तसेच जुन्या निकालावरून निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नवलखा सध्या नजरकैदेत असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे.
नवलखा यांना ऑगस्टमध्ये २०१८ मध्ये अटक केली होती. आतापर्यंत त्यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तो नामंजूर करण्यात आला. सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यामुळे नियमित जामीन मिळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

मराठी की अमराठी... तेजश्री प्रधानला दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय? म्हणते- माझा होणारा नवरा फक्त...

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

25 लाखांचा प्रश्न आला, उत्तरही बरोबर होतं; तरी गेम सोडला! फीअभावी शाळेबाहेर पडलेला आज 400 मुलांचा ‘गुरू’

SCROLL FOR NEXT