मुंबई

मास्कसाठी टास्कफोर्सचे निवेदन सादर करा

CD

मुंबई, ता. २१ : राज्यात काही ठिकाणी ‘एच३ एन२’चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, सध्याच्या स्थितीत मास्क लावण्यासंदर्भात ‘टास्क फोर्स’चे काय म्हणणे आहे, याबाबतचे निवेदन गुरुवारी (ता. २३) विधान परिषदेत सादर करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांकडून आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात आले. त्या वेळी सध्या राज्यात ‘एच३ एन२’ रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात उपस्थित वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले. एच३ एन२ च्या वाढत्या प्रभावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मास्क फक्त रुग्णांनीच लावायचा आहे, की सर्वांनीच लावायचा आहे? यासर्व परिस्थितीबाबत टास्क फोर्सचे काय म्हणणे आहे, त्याचे निवेदन सरकारच्या वतीने सभागृहात येत्या गुरुवारपर्यंत सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अहवाल सादर केला जाईल, असे उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT