मुंबई

इक्बाल सिंह चहल ‘स्पिरिट ऑफ मुंबई’

CD

मुंबई, ता. २५ : कोविड विषाणू संसर्ग कालावधीत केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘द स्पिरीट ऑफ मुंबई’ हा पुरस्कार प्रदान करून आज गौरवण्यात आले.
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्रीषण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सोसायटी व सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम्, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, उपाध्यक्ष एम. व्ही. रामनारायण व इतर मान्यवर उपस्थित होते. रमेश बैस यांच्या हस्ते या वेळी चहल यांच्यासह धारावी (जी/उत्तर विभाग) मध्ये उल्लेखनीय कर्तव्य बजावणारे महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचणेकर, पास्कल सलढाणा व दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. ‘खाना चाहिए’ व ‘भजन समाज’ घाटकोपर या संस्थांनादेखील कोरोना काळातील सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT