मुंबई

मुंबईत आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन

CD

मुंबई, ता. २९ : राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात लागू हेाणारे शैक्षणिक धोरण, तसेच साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील बदलणारे नवे आयाम आदींवर चर्चा घडविण्यासाठी मुंबईत रविवारी (ता. २) आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘विकास प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित हे संमेलन भांडुप पूर्वेतील शिवाई विद्यालयात पार पडणार आहे.

संमेलनाला साहित्यिका आशालता कांबळे अध्यक्षा; तर उद्‍घाटक म्हणून सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक-संपादक प्रा. आनंद देवडेकर असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. श्रीकृष्ण टोबरे हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या ‘कथाकथन’ परिसंवादात प्रा. सिंधुताई रामटेके सुंदर कथाकथन करतील. या संमेलनात ‘नवीन शैक्षणिक धोरणाचे दुरगामी परिणाम’ या विषयावरील परिसंवादात प्रा. विजय मोहिते, पत्रकार भास्कर सरोदे सहभागी होतील; तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत शुद्धोदन आहेर हे या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

‘भारतीय लोकशाही काल, आज आणि उद्या’ या दुसऱ्या परिसंवादात प्रा. सुमेध पारवे, प्रा. गोविंद गायकवाड आदी विचार मांडतील. अखेरच्या सत्रात कवी अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत कविसंमेलन होईल. यामध्ये कवी बबन सरोदे, राजरत्न राजगुरू, नीलाताई वाघमारे, उत्तम भगत, कवी दीप, मिलिंद जाधव, वर्षा भिसे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ, वृषाली माने, हरेश कुलकर्णी आदी कवी सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT