मुंबई

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात परिसंवाद

CD

मुंबई, ता. ९ : महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहानिमित्त मुंबई विद्यापीठात विशेष परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. मनीषा करणे यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात सोमवारी (ता. १०) ‘फुले-शाहू-आंबेडकर विचारमंथन’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या परिसंवादात डॉ. धम्मसंगिनी गोरख, प्रा. कांचना महादेवन, डॉ. श्रीरंजन आवटे, डॉ. अनिल सकपाळ सहभागी होतील. दुसऱ्या सत्रात ‘आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी योगदान’ या विषयावर डॉ. सुनीता मगरे, डॉ. अरुण वाघेला, डॉ. सुरेश मैंद, डॉ. सुनील अवचार आपले विचार मांडतील. मंगळवारी (ता. ११) कविसंमेलनाचे आयोजन केले असून त्यात अविनाश गायकवाड, छाया खोब्रागडे, राकेश शिर्के, कविता मोरवणकर, सुदाम राठोड आदींचा सहभाग असेल. बुधवारी (ता. १२) ‘महात्मा जोतिराव फुले आणि सत्यशोधक समाज : समकालीन संदर्भ’ या विषयावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. आशालता कांबळे, सतीश पावडे, डॉ. देवकुमार अहिरे आणि डॉ. वंदना महाजन आपले विचार मांडतील. गुरुवारी (ता. १३) सकाळी टेक्सास विद्यापीठाचे प्रा. स्कॉट स्ट्राऊड यांचे विशेष व्याख्यान होईल, तर दुपारी ‘फुले, शाहू, आंबेडकर : स्त्रीवाद’ या विषयावर डॉ. वंदना महाजन, डॉ. लता प्रतिभा मधुकर, सुरेखा पैठणे आदी आपले विचार मांडतील. जयंती सप्ताहाचा समारोप शुक्रवारी (ता. १४) संविधान रॅलीने होणार आहे. ही रॅली विद्यापीठाच्या कलिना संकुल परिसरात काढली जाणार असल्याचे डॉ. करणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT