मुंबई : सार्वजनिक ठिकाणी जर एखाद्या महिलेची छेडछाड केली, तर त्यात संबंधित महिला आरोपी ठरत नसून ती पीडित असते, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेअर चुंबन प्रकरणात शिल्पा पीडित होती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
राजस्थानमध्ये सन २००७ मध्ये झालेल्या एड्स जनजागृती कार्यक्रमात हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअरने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात शिल्पा आणि रिचर्डसह आयोजकांवर तक्रार दाखल केली होती. दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही तक्रार मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. दंडाधिकारी न्यायालयाने या खटल्यातून तिची तक्रार रद्दबातल केली आहे.
याविरोधात तक्रारदाराने मुंबई सत्र न्यायालयात अपील याचिका केली होती. नुकतीच न्या. एस. सी. जाधव यांनी शिल्पाच्या विरोधातील अपील याचिका नामंजूर करून गुन्हा रद्दबातल केला आणि दंडाधिकारी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. यासंबंधीचे निकालपत्र आज उपलब्ध झाले.
काय म्हणाले न्यायालय?
शिल्पाने रिचर्ड गेअरला चुंबन केले नसून त्याने शिल्पाचे जबरदस्तीने चुंबन घेतले आहे. त्यामुळे यामध्ये ती सहभागी नव्हती, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. शिल्पा आरोपी आहे किंवा ती यामध्ये सहभागी होती, असे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ती या खटल्यात आरोपी नसून पीडित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.