मुंबई

पालिकेचे नायर रुग्णालय सर्वोत्कृष्ट

CD

मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन या तिन्ही रुग्णालयांतील सेवांवर टाटा इन्स्टिट्यूटने नुकताच अभ्यास अहवाल सादर केला. रुग्णालयांतील सर्वसमावेशक रुग्णसेवेच्या बाबतीत नायर रुग्णालय सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. नायर रुग्णालयातील हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीममुळे (एचएमआयएस) रुग्णसेवा प्रभावी झाली आहे. ही प्रणाली केईएम, सायन, कूपर या रुग्णालयांमध्येही राबवण्यात यावी, असेही अहवालात सुचवण्यात आले आहे.
दरम्यान, केईएम आणि सायन रुग्णालयांत ‘एचएमआयएस’ पद्धत नसल्याने येथील रुग्णसेवेत तुलनात्मक उणिवा असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. तिन्हीही रुग्णालये पालिकेची असून मात्र रुग्णसेवा तसेच सुविधांमध्ये तफावत असल्याचे अभ्यास अहवालात म्हटले आहे. या अभ्यासासाठी तिन्ही रुग्णालयांतील रुग्ण, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, नायर रुग्णालयातील ‘एचएमआयएस’ प्रणालीमुळे रुग्णसेवा जलद तसेच प्रभावी झाली आहे. यातून आरोग्य सेवांचे गुणवत्तापूर्ण विभाजन झाल्याचे म्हटले आले; तर केईएम आणि सायन रुग्णालयात कोणतीही प्रणाली नसल्याने लॅब अहवाल, रेडिओलॉजी अहवाल तसेच ओपीडीमध्ये डॉक्टरांना हाताने औषधे लिहून द्यावी लागतात. त्यामुळे ‘एचएमआयएस’ही प्रणाली केईएम आणि सायनसारख्या सार्वजनिक प्रमुख रुग्णालयांमध्ये राबवणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये नेहमीच रुग्णसेवेवर ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी आत्याधुनिक प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल इंडिया आणि डिजिटल हेल्थकेअरच्या पद्धतीला चालना देण्याचे सुचवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT