मुंबई

एकट्या कमावत्या महिलेला बाळ दत्तक घेण्याचा अधिकार

CD

मुंबई, ता. १३ : एकट्या अर्थाजन करणाऱ्या महिलेलादेखील बाळ दत्तक घेण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. एकटी आणि कमावती असलेली महिला बाळाकडे लक्ष देऊ शकणार नाही, असे म्हणणे ही मध्ययुगीन पुराणमतवादी काळातील मानसिकता आहे, असेही न्यायालयाने सुनावले आहे.
बाल न्याय कायद्यानुसार एकल कमावत्या महिलेला दत्तक अधिकार आहे आणि जिल्हा न्यायालयाने केवळ दत्तक विधान प्रक्रियेच्या तरतुदीचे पालन होते का, ते तपासायला हवे होते, असे निरीक्षण न्या. गौरी गोडसे यांनी नोंदवले आहे. सर्वसाधारणपणे एकल पालक हा कमावत असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टी गृहीत धरून तो मुलाचा सांभाळ करू शकणार नाही, असे समजण्यात तथ्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. कमावती आई नोकरीसाठी बाहेर जाते म्हणून ती योग्य काळजी घेऊ शकत नाही, असा विचार मध्ययुगीन कौटुंबिक मानसिकतेचे प्रतीक आहे. जर कायदा अशी परवानगी देत असेल, तर जिल्हा न्यायालयाने असा विचार करणे फोल ठरते, असेही न्यायालयाने सुनावले आहे.
...
भुसावळमधील प्रकरण
भुसावळमधील जिल्हा न्यायालयाने एका शिक्षक असलेल्या घटस्फोटित महिलेला तिच्या बहिणीचे चार वर्षांचे बाळ दत्तक घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. बाळाचे जन्मदाते पालकांनी या दत्तक विधानला परवानगी दिली आहे आणि बाळाच्या जन्मदाखल्यावर तसे बदल करण्याची मागणी केली होती. स्थानिक बाल संरक्षण समितीनेदेखील याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे; मात्र जिल्हा न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. नवीन पालक एकल कमावती महिला असल्यामुळे ती बाळाची देखभाल करू शकणार नाही, असे मत व्यक्त केले होते. याविरोधात मूळ पालक आणि दत्तक पालकाने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT