मुंबई

आयसीआयसीआय बँकेकडून यूपीआय पेमेंटसाठी ‘ईएमआय’

CD

मुंबई, ता. १७ : आयसीआयसीआय बँकेने क्यूआर कोड स्कॅन करून होणाऱ्या दहा हजार रुपयांपेक्षा जास्त यूपीआय पेमेंटसाठी ईएमआय सुविधा सुरू केली असून अशी सुविधा देणारी ही पहिली बँक ठरली आहे.
‘बाय नाऊ पे लेटर’ या सेवेसाठी ग्राहकांना पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. तीन, सहा किंवा नऊ महिन्यांच्या हप्त्यांमध्ये ही रक्कम देता येईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाणसामान, वस्त्रप्रावरणे, प्रवास आणि हॉटेल बुकिंग आदी सर्व बाबींसाठी क्यूआर कोड वापरून पेमेंट केल्यानंतर ही सुविधा घेता येईल. दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट असल्यास तीन ते नऊ महिन्यांत रक्कम फेडता येईल. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंगसाठीदेखील काही दिवसांमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बँकेचे डिजिटल चॅनेल हेड बिजिथ भास्कर यांनी दिली. यासाठी दुकानात जाऊन खरेदी केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या ‘आय मोबाईल पे’ ॲप वरून पेमेंट करण्यासाठी स्कॅन एनी क्यूआरवर क्लिक करा. दहा हजार रुपयांपेक्षा मोठी रक्कम असल्यास पे लेटरवर क्लिक करा, ईएमआयचा कालावधी निश्चित करा, पेमेंट कन्फर्म करा, या पद्धतीने ही सुविधा घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

Pune News : चेहरा दाखवला तरच मिळणार पगार; झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम, महापालिकेने विकसित केले ॲप

Nagpur Goa Shaktipeeth Highway : भाविकांच्या भावनांशी खेळ? शक्तिपीठ महामार्गावरून माहूर तीर्थक्षेत्र थेट 17 किलोमीटर लांब ढकलले; नव्या नकाशात कोणता केला बदल?

SCROLL FOR NEXT