मुंबई

‘बळी राज सेने’ला पाठिंबा नाही

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : कुणबी सेनेसह राज्यातील विविध सामाजिक संघटनांनी मिळून ‘कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी’ची स्थापना केली आहे. त्यामुळे नवीन स्थापन होणाऱ्या कुणबी समाजाच्या ‘बळी राज सेना’ या पक्षाला पाठिंबा नसल्याचे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी जाहीर केले आहे.

गेल्या २३ वर्षांपासून कुणबी सेना ही सामाजिक संघटना कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी कुणबी समाजातील काही पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात ५० टक्के असलेल्या कुणबी समाजासाठी ‘बळी राज सेना’ हा राजकीय पक्ष स्थापन केला असून त्याची २२ एप्रिल रोजी घोषणा केली आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये कुणबी समाजाची मोठी संख्या आहे. समाजासाठी नवीन पक्ष काढला तरी एका समाजाच्या आधारावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे नवीन स्थापन होणाऱ्या कुणबी समाजाच्या पक्षाला कुणबी सेना पाठिंबा देणार नाही, असे विश्वनाथ पाटील यांनी जाहीर केले.

मुंबई, कोकण, विदर्भ व खानदेशातील १६ जिल्ह्यांतील विविध कुणबी संघटनांनी कुणबी सेनेला पाठिंबा दर्शवला आहे. सर्व कुणबी समाज संघटना एकत्र येऊन याअगोदरच ‘कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी’ची स्थापना झाली आहे. यापुढे राजकीय पक्षांनी जर कुणबी समाजाची दखल घेतली नाही, तर नाइलाजास्तव कुणबी बहुजन स्वराज्य पक्षातून सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार कुणबी सेनेने केला आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT