मुंबई

वडाळ्यातील मशिदींवरील ध्वनिक्षेपकाविरोधात याचिका

CD

मुंबई, ता. २२ : वडाळ्यात असलेल्या मशिदी आणि शामियान्यामध्ये होणाऱ्या ध्वनिक्षेपकाच्या वापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ नागरिकाने याचिका दाखल केली आहे. ध्वनिक्षेपकाच्या कर्कश्श आवाजामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
वडाळ्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाने ॲड. प्रेरक चौधरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकादार महेंद्र सप्रे निवृत्त मरीन इंजिनिअर असून त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजार आहेत. त्यांच्या हृदयात तीन स्टेन बसवलेल्या आहेत. वडाळा रेल्वे मार्ग आणि बंगालीपुरा परिसरात सुमारे १९ मशिदी आणि शामियान्यांत लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. या ठिकाणी सायलेंट झोन असताना सर्रासपणे मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावणे सुरू असते. गंभीर उच्चरक्तदाब असल्यामुळे या मोठ्या आवाजाचा त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो, असे त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे.
प्रभारी मुख्य न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने विचारलेल्या एका प्रश्नाचा खुलासा करताना ॲड. चौधरी यांनी स्पष्ट केले, की उच्च न्यायालयाने अन्य समाजघटकांसाठीही याबाबत आदेश दिले तर त्याचे स्वागत असेल. प्रदूषणविरहित वातावरणात शांततेत आयुष्य जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण होत आहे, असा दावा या वेळी याचिकादारांकडून करण्यात आला. प्रशासनाने यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
...
‘सौदी’त लाऊडस्पीकरचा वापर बंद
परदेशात सौदी अरेबिया देशाने लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. या ध्वनिक्षेपकांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा याचिकादाराने केली होती; मात्र त्याची दखल घेतली नाही, असा खुलासा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT