मुंबई

मेंदूमृत बारा वर्षीय मुलाचे अवयवदान

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : अवयवदान हे सर्वोत्तम दान आहे. याला महत्त्व देत एका पालकाने आपल्या १२ वर्षांच्या ब्रेनडेड मुलाचे अवयवदान करून तिघांना नवजीवन दिले. या घटनेतील मुलाला १४ एप्रिल रोजी रस्ता अपघातानंतर के. जे. सोमय्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. १८ एप्रिल रोजी त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. दरम्यान अतिदक्षता पथकाने अवयवदानाबाबत कुटुंबीयांचे समुपदेशन केले. सुरुवातीला नकार देणाऱ्या पालकांनी समुपदेशनानंतर २१ एप्रिल रोजी मुलाच्या अवयवदानासाठी परवानगी दिली. कुटुंबीयांच्या संमतीनंतर, मुलाचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले आणि तीन वेगवेगळ्या रुग्णांना दान करण्यात आले.
या वेळी सुरुवातीला मुलाच्‍या मृत्यूचे सत्य स्वीकारणे, आमच्यासाठी खूप कठीण होते; परंतु डॉक्टरांनी आमच्या सर्व प्रश्नांची धीराने उत्तरे दिली आणि त्यानंतर आम्ही त्याचे अवयवदान करण्याचा आणि इतरांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला, अशी भावना मृत मुलाच्या पालकांनी व्यक्त केली.
--
रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाची माहिती उघड करू नये, अशी विनंती केली आहे. त्यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांची माहिती देता येत नाही. एका महिन्यात मेंदूमृत झालेल्या तरुणाचे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येण्याची ही तिसरी घटना आहे.
- ऊर्मिला महाजन, समन्वयक, झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT