मुंबई

बीएडऐवजी एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक अभ्यासक्रम आणि त्यांची रचना बदलली जात आहे. त्यात आतापर्यंत सुरू असलेले बी.एड.सारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी आता चार वर्षांचा ‘एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम’ (इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅम-आयटीईपी) आणला जाणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आयटीईपी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता निश्चित केली आहे. बीए, बीकॉम, बीएससी किंवा तत्सम पदवी अभ्यासक्रमांच्या जोडीलाच आयटीईपी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. याबाबत अद्यापही निर्णय झालेला नसला, तरी या स्वरूपाचा अभ्यासक्रम असण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक बनण्यासाठी दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता; मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएड अभ्यासक्रम बंद करून आयटीईपी हा चार वर्षांचा नवा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे एक वर्ष वाचणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सर्व विद्यापीठे, नॅकचा अ दर्जा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात हा अभ्यासक्रम लागू करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्राथमिक शिक्षकांसाठी डी.एड. ही पात्रता आवश्यक होती; मात्र यापुढे पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठीही ‘आयटीईपी’ अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

‘उच्च क्षमतेचा शिक्षक तयार होईल’
आयटीईपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण क्षमता मिळवलेला शिक्षक तयार होईल, असा विश्वास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने व्यक्त केला आहे. आयटीईपी अभ्यासक्रमातून पूर्व प्राथमिक ते दुसरी त्यानंतर तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी आणि दहावी तसेच अकरावी आणि बारावी या चार स्तरांसाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक निर्माण केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT