मुंबई

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर भर

CD

मुंबई, ता. २९ : देशाची पुढची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षण विभागाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील रिसॉर्टमध्ये दोन दिवसीय शालेय शिक्षण विभाग प्रशिक्षण कार्यशाळा आज पार पडली. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी उद्‍घाटनाच्या सत्रात केसरकर बोलत होते. कार्यशाळेमध्ये नवीन धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात असलेले अनेक संभ्रम आणि त्यासाठी स्पष्टता शिक्षक, तज्ज्ञ, अधिकारी वर्गामध्ये यावी यासाठी सखोल चर्चा झाल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नवीन शैक्षणिक धोरण आणि समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा लोणावळा येथील दि ॲम्बी व्हॅली सिटी येथे घेण्यात आली. केसरकर म्हणाले, की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत एकत्र विचारमंथन करावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाट्य आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक अभ्यास, नावीन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासारख्या विविध बाबींवर वैचारिक देवाण-घेवाणही कार्यशाळेत करावी. आपल्या सूचनांचा शासनस्तरावर विचार करून शिक्षण विभागाची पुढची दिशा ठरवली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

कार्यशाळेत शालेय गुणवत्ता, समग्र शिक्षा अभिनयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले निपुण महाराष्ट्र अभियान, तसेच स्टार्स प्रकल्पासंदर्भात राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी पहिल्या दिवशी मांडला. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता आणि त्याची होत असलेली शैक्षणिक प्रगती यावरही यावेळी माहिती देण्यात आली; तर दुसरीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात सुरू असलेल्या तयारीसंदर्भात माहिती सादर करण्यात आली. कार्यशाळेला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करताना शालेय शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत आहे. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणावर निधी सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.
- रणजितसिंह देओल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वंकष शिक्षणाला विभागाने प्राधान्य दिलेले आहे. शिक्षणातील बदलते स्वरुप पाहता आगामी काळात आपल्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT