मुंबई

राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

CD

मुंबई, ता. १ : मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये एकूण ४०२ कोटींची ९,९७९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
लोकन्यायालयाचे उद्‍घाटन हे वृक्षाला जल अर्पण करून करण्यात आले. या वेळी पक्षकार, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम तसेच सरकारी वकील देसाई उपस्थित होते. लोक अदालतीसाठी संपूर्ण शहरामध्ये ८६ पॅनलची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटर अपघात, बँकेचे वाद, वीजसंबंधित दावे, मोबाईल कंपनीच्या तक्रारी अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोक अदालतमध्ये ४५,३३१ प्रलंबित व ८०,७९१ दाखलपूर्व असे एकूण १,२६,१२२ दावे सुनावणीसाठी होते. त्यापैकी ८,३४५ प्रलंबित व १,६३४ दाखलपूर्व अशी एकूण ९,९७९ प्रकरणे तडजोडीने निकाली लागली. लोकअदालतीच्या पार्श्वाभूमीवर मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये या पाच दिवसांत १०,३१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT