मुंबई

राजर्षी शाहू महाराज शताब्दी वर्षपूर्ती साजरी करा

CD

मुंबई, ता. १ : भारतीय आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त ६ मे रोजी राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
शिक्षण विभागाने सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी लागू केली असली तरी राजर्षी शाहू महाराज शताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आदी योगदानाचा गौरव करावा असेही सांगण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईतील हिंदी भाषिक शिक्षक मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी गेले असले तरी मराठी आणि मुंबईत राहणारे शिक्षक येथे असल्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आदी ठिकाणच्या शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त ६ मे रोजी कार्यक्रम साजरे करण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली असल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यासाठी कार्यक्रम आराखडा, त्याचे स्वरूप जाहीर करायला हवे होते. इतक्या मोठ्या महापुरुषांच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त केवळ विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांची तयारी असली तरी कार्यक्रम काय करायचे यावर प्रश्नचिन्ह आहेत. केवळ निबंध स्पर्धा, रांगोळी आणि वक्तृत्व आदी स्पर्धा नको, त्यापेक्षा राजर्षी शाहू महाराज यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्याना मिळाली पाहिजे, असे मत शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी व्यक्त केले.

--------------------
६ मे रोजीच निकाल जाहीर करा
शिक्षण विभागाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर ६ मे रोजी राज्यात छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन साजरा करून शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा. याच दिवशी विद्यार्थी, पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT