मुंबई

पी डी`मेलो रोडच्या सुशोभीकरणावर दोन कोटी रुपयांचा खर्च

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई सुशोभीकरण अभियानांतर्गत बी विभागातील डी’मेलो रोडवरील जिनाभाई मूलजी राठोड मार्ग जंक्शनपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यावर तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
‘बी’ विभागातील प्रभाग क्रमांक २२३ मध्ये विविध पदपथ, वाहतूक बेट, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानुसार बी विभागाने उपलब्ध अर्थसंकल्पीय निधीमधून हे काम करण्याचे प्रस्ताविले आहे. या स्थळाची या कार्यालयाच्या संबंधित अभियंत्यांनी पाहणीदेखील केली. स्थापत्य कामासाठी ५८ लाख २ हजार ५८५ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर कामासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या. त्याला तीन निविदाकारांनी प्रतिसाद दिला. त्यातील मे. पाटील इलेक्ट्रिकल यांची निविदा ही लघुत्तम आहे. त्यांनी १ कोटी ५४ लाख १९ हजार ८७९ रुपये इतक्या रकमेची निविदा दाखल केली आहे. या कामामध्ये बी विभागातील पी डी’मेलो रोडवरील पदपथावर विद्युत रोषणाई व सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी पालिकेने साधारणतः ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवले आहे. त्यामुळे ही दोन्ही कामे या परिसरामध्ये केली जाणार असून त्यावर साधारणतः दोन केटी रुपये खर्च केला जाणार आहे. मुंबईचे सौंदर्य वाढवण्यासाठी व प्रदर्शनीय करण्यासाठीची कामे कंत्राटदाराला ९० दिवसांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT