मुंबई

बीएच्या निकालातील त्रुटींबाबत समिती

CD

मुंबई, ता. २ : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए सत्र ५ मानसशास्त्र विषयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळाल्याची बाब समोर आली होती. त्याची दखल घेत विद्यापीठाने २९ एप्रिलला जाहीर झालेल्या निकालातील अनेक प्रकारच्या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी एक समिती नेमली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवराम गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती मानसशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची माहिती घेऊन त्यावर आपला अहवाल सादर करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एकाच विषयात विद्यार्थ्यांना मिळालेले जास्त गुण किंवा मिळालेले कमी गुण यांचेही मूल्यमापन केले जाणार आहे. या समितीला तात्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आज विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाघोली-लोहगाव रस्ता बंद, खासगी कंपनीची बस अडकली, सकाळपासून घडलेल्या घटना!

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात ऊन-सावलीच्या खेळात मध्येच कधीतरी रिमझिम, अलर्टमध्येही पावसाची पाठ; दीड ते तीन मिमी नोंद

Latest Marathi News Update: वंरध घाटात पुन्हा दरड कोसळली, ५ ते ७ गाड्या अडकल्या; रस्ता बंद

सेलिना जेटलीच्या पुनरागमनामागचं कारण काय? १५ वर्षांनी स्वीकारली कारकिर्दीतील 'सर्वात मोठी' भूमिका

Bhimashankar Update : भीमाशंकरला जाण्याचा बेत आखताय? मुसळधार पावसामुळे 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, कधी होणार पुन्हा खुली?

SCROLL FOR NEXT