मुंबई

अवकाळी पावसामुळे हवेत सुधारणा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्यात अवकाळी पावसामुळे, तर मुंबईत समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सध्या हवा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ६३ नोंदवला गेला. त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेता आला.
राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. मुंबईतही उन्हाचा तडाखा वाढल्याने मुंबईकर हैराण आहेत. मात्र याच कालावधीत समुद्राकडून वारे वाहू लागल्याने मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता शुक्रवारी सुधारल्याचे निदर्शनास आले. सफर या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीवर मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६३ नोंद करण्यात आला होता, असे सफर संस्थेचे माजी प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग यांनी सांगितले. शुक्रवारी बीकेसी येथे १३५, चेंबूर ८९, कुलाबा ७१ एक्यूआय हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आल्याचे सफरच्या अहवालातून समोर आले आहे. या सुधारलेल्या हवा गुणवता निर्देशांकामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
...
शहर - एक्यूआय दर्जा
(मुंबई - ६३)
कुलाबा - ७१
माझगाव - ५५
बीकेसी - १३५
मालाड - ६३
अंधेरी - ५७
चेंबूर - ८९
बोरिवली - ५७
वरळी - ४०
भांडुप - ४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT