मुंबई

मेंदू मृत व्यक्तीमुळे पाचजणांना जीवदान

CD

मेंदूमृत व्यक्तीमुळे पाच जणांना जीवदान
विविध रुग्णालयांत पाठवले अवयव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत झालेल्या १५ अवयवदानात ४१ वर्षीय ब्रेन डेड (मेंदूमृत) रुग्णाच्या अवयवांनी पाच जणांना नवे जीवन दिले आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनी किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार त्‍यांचे अवयव विविध रुग्णालयांमध्‍ये उपचार दाखल रुग्णांना दिले गेले.
जसलोक रुग्णालय अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये, ४१ वर्षीय रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत त्याच्या भावाने गंभीर परिस्थितीत दाखल केले होते. अनेक चाचण्या आणि सीटीस्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या डाव्या बाजूला ब्रेन हॅमरेज झाल्याचे आढळून आले. मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी हाडाचा एक मोठा फ्लॅप काढून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मेंदूला सूज आल्याने आणि मेंदूच्या महत्त्वाच्या संरचनेवर दबाव आल्याने त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्‍यानंतर रुग्णाच्‍या नातेवाईकांनी त्‍यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्‍यामुळे पाच जणांना नवे जीवन मिळाले.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप धाडस लागते. या कुटुंबाने ते करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णाचे अवयव दान करून इतर लोकांना नवीन जीवन मिळणार आहे.
– डॉ. दीपू बॅनर्जी, न्यूरोसर्जन, जसलोक रुग्णालय

अवयवांसाठी ग्रीन कॉरिडॉर
रुग्णाचे अवयव वेळेत इतर रुग्णांपर्यंत पोहोचावे, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची मदत घेतली गेली. त्‍यांनी दान केलेले अवयव विविध रुग्णालयांपर्यंत पोहोचवता यावेत, यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार केल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

यांना अवयव मिळाले
जसलोक रुग्णालयात २३ वर्षीय व्यक्तीला किडनी आणि ६९ वर्षीय व्यक्तीवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
दुसरी किडनी नायर रुग्णालयात पाठवण्यात आली आणि २५ वर्षीय व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.
हृदय नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात पाठवून त्याचे प्राण वाचवण्यात आले.
एचएन रिलायन्स रुग्णालयात ५९ वर्षीय व्यक्तीचे फुप्फुस प्रत्यारोपण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT