मुंबई

दंगलीप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मालाडमध्ये एका महिन्यापूर्वी झालेल्या दंगलीत गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी रिट याचिका केली आहे. मालवणीमध्ये रामनवमीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांचाही समावेश असून, त्यांनी उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका केली आहे. मर्चंट यांनी या प्रकरणात सहभाग असल्याचे खंडन याचिकेतून केले आहे. मालवणीमध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी मी पोलिसांना मदत करत होतो, मी कोणालाही चिथावणी दिली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. मर्चंट यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT