मुंबई

यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ एक गणवेश

CD

मुंबई, ता. २२ : सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ एक गणवेश मिळणार आहे. आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दोन गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी त्याची विभागणी करण्यात आली असून त्यातील एक गणवेश हा समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि दुसरा हा कंत्राटदारांच्या माध्यमातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे एक गणवेश लगेच मिळणार असला तरी दुसऱ्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या ताटकळत बसावे लागणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना आतापर्यंत समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पुरविण्यात येतो. दोन गणवेशासाठी ६०० रुपयांचा निधी शाळांना वितरीत केला जातो. त्यामाध्यमातून शाळा, व्यवस्थापन समित्या त्या खरेदी करून ते विद्यार्थ्यांना पुरवत असतात. आता हा गणवेश कंत्राटदारांच्या माध्यमातूनच पुरवण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यंदा सरकारी शाळांतील विविध घटकांच्या ३७ लाख ३८ हजार १३१ विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये प्रमाणे २२४ कोटी २८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात आता समग्र शिक्षा अभियान हे एकच गणवेश पुरविणार असल्याचे त्यासाठी ११२ कोटी १४ लाख रुपयेच खर्च केले जाणार आहेत.
...
सरसकटसाठी निधीच नाही!
सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सरसकट विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. त्यासाठी ७८ कोटींची तरतूद झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आतापर्यंत यासाठी एकही रुपया वित्त विभागाने या गणवेशासाठी मंजूर केले नाही. यामुळे खुल्या प्रवर्गातील ११ लाख १६ हजार २०१ विद्यार्थी गणवेशापासून दूर राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT