मुंबई

एनसीसीच्या विस्तारासाठी सरकारकडून सर्व सहकार्य!

CD

मुंबई, ता. २३ : विद्यार्थ्यांना घडवणारे लष्करी शिस्तीचे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा यात सहभाग वाढावा यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे. या प्रक्रियेला राज्य सरकारकडून सर्व आवश्यक सहकार्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रीय छात्रसेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी आज मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक योगेंद्र प्रसाद खंडुरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. लष्करी शिस्त, देशप्रेम अंगी बाणवणाऱ्या एनसीसीमध्ये सहभागासाठी राज्यातील तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीचे विद्यार्थी संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. या जागा वाढल्यानंतर सध्या एनसीसीत सहभागी होणाऱ्या सव्वा लाख विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारांनी वाढणार आहे. या अतिरिक्त जागा वाढवण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र एनसीसीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. याबाबत केंद्र शासनाकडे निधी आणि अनुषांगिक बाबींसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला सिंग यांनी महाराष्ट्रातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT