मुंबई

पालिका कचरापेट्या खरेदी करणार,

CD

पालिकेकडून १२ हजार कचरापेट्यांची खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः कचरापेट्यांची दुरवस्था झाल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने नवीन कचरापेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका १२ हजार कचरापेट्या सरासरी अडीच हजार रुपयांना एक या दराने खरेदी करणार आहे. यावर सुमारे ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
नगरसेवक निधी आणि घनकचरा विभागाच्या माध्यमातून सोसायट्या आणि इतर ठिकाणी या पेट्यांचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी १२० आणि २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या वापरात होत्या. यातील २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या प्रत्येकी २०५६ रुपयांना विकत घेण्यात आल्या होत्या. यात आता ४१० रुपयांची वाढ झाल्याने एक कचरापेटी २४६६ रुपयांना विकत घेण्यात येत आहे; तर १२० लिटर क्षमतेची कचरापेटी १,८८० रुपयांना विकत घेण्यात आली‍ आहे.
कचरापेट्या विकत घेण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत तीन कंपन्यांनी भाग घेतला. नीलकमल लिमिटेड, ॲरिस्ट्रोटलास्ट प्रोडक्ट लिमिडेट आणि विमप्लास्ट या कंपन्यांनी यामध्ये भाग घेतला होता. पावसाळ्यापूर्वी या कचरपेट्यांचे वाटप केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT