मुंबई

वाहन विमा-मेडिक्लेमचे व्यवहार स्वतंत्र

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : एखाद्या अपघातात पीडित व्यक्तीला विमा कंपनीकडून दिली जाणारी ‘मेडिक्लेम’ परताव्याची रक्कम ही विमा कंपनीकडून वाहनाच्या मालकाला दिल्या जाणाऱ्या रकमेतून देता येणार नाही. संबंधित दोन्ही व्यवहार स्वतंत्र आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे.

वडिलांच्या मेडिक्लेम पॉलिसीवर मुलाला मिळालेली रक्कम न्यायालयाने ग्राह्य धरत मोटार अपघात तक्रार निवारण मंचाने दिलेला निर्णयही कायम ठेवला आहे. मेडिक्लेम आणि वाहन विमा हे दोन्ही स्वतंत्र वर्गातील आर्थिक व्यवहार आहेत आणि दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून त्याची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे विमा कंपनी या दोन्ही संलग्न करून परताव्याची रक्कम वाहनमालकाच्या भरपाईमधून वगळू शकत नाही, असे न्या. शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च २०१४ मध्ये अमन टाक यांचा आणि त्यांच्या मित्राचा दुचाकीवरून जात असताना डम्परला धडक लागून गंभीर अपघात झाला होता. यामध्ये त्यांना मेंदूला इजा, स्मृतिभ्रंश आदी आजार झाले. मोटार अपघात न्यायालयाने त्यांना सुमारे १४,४४,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या वतीने न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते.

संबंध आणि साधर्म्य नाही!
मुलाला वेगळी मेडिक्लेमची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे ही रक्कम कमी करून द्यायला हवी, असा युक्तिवाद कंपनीच्या वतीने न्यायालयात करण्यात आला; मात्र मुलाच्या वडिलांनी मेडिक्लेमची रक्कम भरली आहे; तर वाहनचालकाने विमा हप्ता भरला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि याचिका नामंजूर केली. दोन्ही आर्थिक व्यवहार करार भिन्न आहेत आणि त्यामध्ये संबंध आणि साधर्म्य नाही, त्यामुळे त्यांना स्वतंत्र भरपाई मिळू शकते, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT