मुंबई

गजल मैफलीला मोठा प्रतिसाद

CD

मुंबई, ता. २८ : गझलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या गल गायनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील मराठी, उर्दू गजलांची भावगर्भ मैफल मुंबईत शिवाजी मंदिर येथे शनिवारी संध्याकाळी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची त्यांना साथ लाभली.
पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा’, ‘आयुष्य तेच आहे’, ‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा’, ‘मी किनारे सरकताना पाहिले’, ‘हा असा चंद्र’, ‘करते थोडी स्वप्ने गोळा’ इत्यादी लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर केल्या. या मैफिलीत गिरीश पाठक (तबला), सुधाकर अंबुसकर (हार्मोनियम), संदीप कपूर (गिटार), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), अब्रार अहमद (संतूर), राशिद खान (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी साथसंगत लाभली, तर रवींद्र वाडकर यांनी या मैफलीचे सूत्रसंचालन केले. या वेळी निवृत्त पोलिस उपायुक्त उत्तमराव बोधावडे, निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते प्रमोद पवार, ज्येष्ठ समाजसेविका स्नेहलता संजय अवनखेडकर, अशोक भगत, समाजसेवक विक्रांत आचरेकर, निर्माती, दिग्दर्शिका अश्विनी जालिंदर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पांचाळे यांना गझलसागर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT