मुंबई

भोईवाडा ‘एसआरए’त तीनहजार घरांचा ताबा

CD

मुंबई, ता. ३० : मुंबईतील एसआरए विकसक ‘ओमकार रिअल्टर्स’ने त्यांच्या भोईवाडा (परळ-शिवडी पट्टा) निवासी प्रकल्पात तीन हजार पुनर्वसन घरे तयार करून विक्रम केला आहे. नुकताच ३७० पुनर्वसन घरांचा ताबा देऊन कंपनीने हा विक्रम नोंदवला आहे. या प्रकल्पात आता १६ हजारांहून अधिक झोपडपट्टीवासीयांना घरे मिळाली आहेत.

प्रकल्पाच्या सध्याच्या टप्प्याच्या अखेरीस सुमारे २५ हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळतील. ओमकार रिअल्टर्स आणि एलअँडटी रिअल्टी यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. यात जूनच्या मध्यात अतिरिक्त २३२ घरांचा ताबा दिला जाईल आणि २०२५ पर्यंत १४०० घरांचा ताबा दिला जाईल. दाट झोपडपट्टी अशी ख्याती असलेला भोईवाडा प्रकल्प १७ एकरांचा असून यात खापरीदेव आणि मारवाडी वाडी तसेच कामगार व छोट्या व्यापाऱ्यांच्या झोपडपट्ट्यांच्या १९ सोसायट्या आहेत. या प्रकल्पात रहिवाशांसाठी २५ बालवाड्या, सहा डीपी मार्ग तसेच महापालिका शाळाही आहेत. यातील १५ टॉवरपैकी आठ टॉवर्स तळमजला अधिक ४० मजली असून, मुंबईतील सर्वांत उंच एसआरए टॉवर अशी त्यांची ख्याती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT