मुंबई

रेल्वे वायफाय जाळ्याचा विस्तार

CD

मुंबई, ता. ३१ : नुरे भारत नेटवर्क या आघाडीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स समूहाने आज पीपोनेट मोबाईल ॲप बाजारात आणण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्कवर सार्वजनिक वाय फाय सुविधा अधिक सुलभ आणि वेगवान होईल. ही माहिती नुरे भारत नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅक्स कृष्णा यांनी दिली.
या नेटवर्कमुळे वायफाय वापरणे सुरक्षित होईल. तसेच भारतीयांना आरोग्यसेवा, शिक्षण आदी सुविधाही देता येतील. विशेषत: तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीच्या शहरांमधील रहिवाशांना ही सुविधा मिळाली की त्यांना अधिक संधींची दारे खुली होतील, असेही ते म्हणाले. भारतीय रेल्वेतील रेलटेल वायफाय नेटवर्कवर रोज पंधरा लाख वापरकर्ते लॉगीन करतात. त्यांना ई तिकीट, प्रवास आणि हॉटेल आरक्षण आदी बाबी या ॲपवरून करता येतील. त्याखेरीज भारतीय कारागिरांना त्यांच्या वस्तू देशभरात विकण्यासाठी ई-कॉमर्स यंत्रणाही पीपोनेट ॲपमार्फत मिळेल. तसेच जाहिरातदारांनाही आपल्या व्यवसायासाठी हे ॲप वापरता येईल. त्यायोगे त्यांच्या व्यवसायातही अनेकपट वाढ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT