मुंबई

राजावाडीतील निवासी डॉक्टर पाणी टंचाईने त्रस्त (यात कोट बाकी आहे)

CD

‘राजावाडी’तील निवासी डॉक्टर
पाणीटंचाईने त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न भेडसावत आहे. आता डॉक्टरांनाही पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राजावाडी रुग्णालयात नव्याने बांधलेल्या आरएमओ हॉस्टेलमधील निवासी डॉक्टर पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. त्याबाबतची तक्रार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना करण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

राजावाडी रुग्णालय परिसरात नवे आरएमओ हॉस्टेल बांधण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, तेथे पाण्याची अडचण पाहून डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षकांना त्याबाबत पत्र लिहून कळवले आहे. हॉस्टेलमध्ये सर्व ज्युनियर डॉक्टर असून राजावाडी रुग्णालयात विविध विभागांमध्ये ते काम करतात. पाण्याची समस्या आधी हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांना सांगण्यात आली; परंतु स्थिती जैसे थे असल्याने वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिण्यात आले आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे ओपीडी आणि शस्त्रक्रिया विभागात अस्वच्छता पसरली असल्याचेही सांगण्यात आले.

पाणीच येत नसल्याने आठवड्याभराचे कपडे धुणे वा इतर सर्व दैनंदिन गोष्टी करणे कठीण जाते, असे हॉस्टेलमधील निवासी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्याशी याबाबत संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT