Mumbai University  sakal
मुंबई

Mumbai University : मुंबई विद्यापीठाला हवा जाणकार, तज्ज्ञ कुलगुरू

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या स्पर्धेत अंतिम पाच जणांपैकी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील प्रा. सुरेश गोसावी, कोल्हापूर विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, बीएआरसीतील डॉ. अर्चना शर्मा आणि बनारस हिंदू विद्यापीठातील प्रा. तेज प्रताप सिंह यांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai - परीक्षा, निकालाची कामे वर्षानुवर्षे चालत असतानाही त्यात कायम गोंधळ निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या मुंबई विद्यापीठात आमूलाग्र बदल घडवणारा नवीन कुलगुरू हवा, अशी मागणी समोर येत आहे. मागील काही काळात ज्यांनी विद्यापीठाचे कामकाज पाहिले; परंतु त्यांना आपल्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक बदल करता आला नाही,

अशांची नवीन कुलगुरूपदी वर्णी लागल्यास विद्यापीठाची अवस्था पुन्हा बिघडण्याचा अंदाज जाणकार अधिकाऱ्यांकडून तसेच शिक्षक संघटनांकडूनही व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला बाहेरच्या राज्यातील कुलगुरू देण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या स्पर्धेत अंतिम पाच जणांपैकी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील प्रा. सुरेश गोसावी, कोल्हापूर विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, बीएआरसीतील डॉ. अर्चना शर्मा आणि बनारस हिंदू विद्यापीठातील प्रा. तेज प्रताप सिंह यांचा समावेश आहे.

कुलकर्णी हे यापूर्वी विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून पाच वर्षे कार्यरत होते. त्यांच्याबद्दल विद्यापीठातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे; तर तेज प्रताप सिंह हे सर्व उमेदवारांमध्ये तज्ज्ञ आणि जाणकार असल्याने त्यांच्यासारख्याची नियुक्ती झाल्यास विद्यापीठात सुधारणा होतील, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.

कुलपतींनीही फटकारले
मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालावर कुलपतींनी नुकतात झालेल्या एका बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव आणि प्रभारी कुलगुरूंना चांगलेच फैलावर घेत निकाल आणि त्यात गोंधळ का होतोय, असा सवाल केला. तसेच सुधारणा करण्याची तंबीही दिली होती; तरीही त्यात फारशी सुधारणा होत नसल्याने विद्यापीठात राजकारण, समाजकारण, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाचे हित जपणारा बाहेरचाच कुलगुरू आल्यास अनेक चांगले बदल होतील, असे अनेकांना वाटते.

विद्यापीठात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे. निकाल, परीक्षा इतकेच नाही तर विविध मंडळांवरील नियुक्त्या आणि वशिलेबाजीमुळे व्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामुळे यात बदल होणे आवश्यक आहे. विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी नवीन तज्ज्ञ आणि ज्यांचा अनुभव, कार्य अधिक चांगले आहे, अशांची निवड व्हावी.
- प्रा. सुभाष आठवले, मुक्टा संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT