मुंबई

गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि जाणता राजा महानाट्याचे आयोजन

CD

‘गेट वे’मध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

मुंबई, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून गेट वे ऑफ इंडिया परिसरात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ६ जूनपर्यंत ते सुरू राहणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त मौजे पाचाड, किल्ले रायगड आणि मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विविध कार्यक्रम होणार आहेत.

शस्त्र प्रदर्शन ६ जूनपर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत आदी चारशेहून अधिक शिवकालीन शस्त्रे मांडण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज दिवसातून चार वेळा युद्ध कला सादरीकरण आणि शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे.

‘जाणता राजा’चे विशेष प्रयोग
७ जूनपर्यंत सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध घटना ‘जाणता राजा’ महानाट्याच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. महानाट्यासाठीच्या प्रवेशिका शहरातील प्रमुख नाट्यगृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT