मुंबई

युरोपीय देशांना कुशल मनुष्यबळ पुरवणार!

CD

मुंबई, ता. १ : नववी आणि ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्यविषयक विषय शिकवले जातात. त्याच जारोवर कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा दावा करत शालेय शिक्षण विभागाने आज युरोपीय देशाला कुशल मनुष्यबळ देऊ शकतो, अशी तयारी दाखविण्यासाठी राज्यस्तरीय कृती गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांसह उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग मंत्र्यांसह सहा प्रधान सचिव आणि एक शालेय शिक्षण आयुक्त अशा १३ जणांचा हा कृती गट स्थापन केला आहे.

कृती गटाच्या कार्यकक्षाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत. युरोपीयन देशाला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उपाययोजना आणि इतर कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची गरज असेल, यासाठीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास हा कृती गट करेल. तसेच शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना परदेशी भाषेचे ज्ञान देण्यासाठी जर्मन भाषा शिकवणे, आयटीआयशी जोडून असलेल्या विषयांपैकी नळ कारागीर, वीजतंत्री, परिचर्या हॉटेल व्यवस्थापन, मेडिकल इक्विरमेंट यासोबत इतर कोणत्या शाखांची गरज लागू शकते यासाठी प्रशिक्षण आराखडा तयार केला जाईल. युरोपीय देशाला लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी ९० टक्क्यांपर्यंत कौशल्य या प्रशिक्षण केंद्रातून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या माध्यमातून प्रशिक्षण देणे, जर्मनीसोबत यासाठी सामंजस्य करार करणे आदी कार्यकक्षा या कृती गटाच्या आहेत.

कौशल्याचा विषय पळवला
नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य विषयक अभ्यासक्रम आहेत. त्यात तोंडओळख आणि अभ्यासापुरतेच क्षेत्र मर्यादित आहे; मात्र दुसरीकडे कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आयटीआयमधून कुशल मनुष्यबळ तयार करण्याचेच शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे युरोपीय देशांना कुशल मनुष्यबळ हे केवळ कौशल्य विकास विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि नव्याने स्थापन झालेले कौशल्य विद्यापीठ करू शकते. कोणतीही यंत्रणा नसलेल्या शालेय शिक्षण विभागाने जर्मनीच्या नावाखाली कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा कार्यक्रम पळविला असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण विभागात उमटल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT