मुंबई

वाहन परवाना बाद झाला तरी नुकसान भरपाई

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : एखाद्या अपघातात जर वाहनचालकाचा परवाना बाद झाला असेल आणि त्याचे नूतनीकरण झाले नसेल तरीही चालकाच्या वारसांना वीमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे. वाहन परवाना बाद झाला याचा अर्थ असा नाही की चालक कुशलतेने गाडी चालवत नव्हता, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या या अपघातातील मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने आयसीआयसीआय लोम्बार्ड वीमा कंपनीला दिले आहेत.

पुण्यात हडपसर येथे राहणाऱ्या आशा बाविस्कर या दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसून त्यांचा मृत्यु झाला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात मोटार अपघात तक्रार निवारण मंचाच्या निकालाविरोधात याचिका केली होती; मात्र चालकाचा परवाना रद्द झाला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही, असा निर्णय मंचाच्या वतीने देण्यात आला होता. या विरोधात कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर केली आहे.

न्या. एस. जी. डिगे यांच्या न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली. वीमा कंपनीने विम्याचे हप्ते वसूल केले आहेत. त्यामुळे त्यांनी वारशांना नुकसान भरपाई द्यायला हवी. विमा कंपनीने ही रक्कम नंतर ट्रकचालकाकडून वसूल करावी; मात्र केवळ परवाना बाद झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gold Theft : कुटुंबीय तळमजल्यावर आजोबांच्या अंत्यविधीची तयारी करताना कोल्हापुरात ३० लाखांचे सोने चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत दिसला पण...

Satara IT Park: सातारकरांसाठी खुशखबर! मंत्रिमंडळाकडून आयटी पार्कला हिरवा कंदील; एमआयडीसीकडे ४२ हेक्टर जमीन वर्ग, रोजगाराच्या नव्या संधी मिळणार..

अग्रलेख : निर्मितीचे नवे वळण

Panchang 23 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहु काळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या

अध्यात्मातून घेऊ काही : आत्ता, इथे, या क्षणी!

SCROLL FOR NEXT