मुंबई

हसन मुश्रीफ यांना २० जूनपर्यंत दिलासा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : मनी लॉण्डरिंगच्या कथित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना २० जूनपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोल्हापूरमधील कागल जिल्ह्यातील आमदार असलेले मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केला असून, मुश्रीफ यांचे दोन कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. तसेच त्यांच्या अनेक मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले आहेत.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मुश्रीफ यांची मुले नावेद, आबीद आणि साजीद, पदाधिकारी असलेल्या मालमत्तेबाबत ईडीने संशय व्यक्त केला आहे. आर्थिक उत्पन्न नसताना मोठ्या रकमेची देवाण-घेवाण यामध्ये झाली आहे, असा दावा ईडीने केला आहे. ईडीने दाखल केलेला अहवाल रद्दबातल करण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याबाबत ईडीने त्यांच्या मालमत्तेवर छापा टाकून चौकशीही सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

पालिकेला १,०६२ कोटींचा दणका! अंधेरी भूसंपादन प्रकरणी विकसकाला वाढीव भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Apple च्या पहिल्या फोल्डेबल 'iPhone Duo' चे प्री-ऑर्डर भारतात सुरू; खरेदीवर मिळतोय 7,000 रुपयांचा डिस्काउंट!

Latest Marathi News Live Update : नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात; कापसाला मिळाला दहा हजार रुपये क्विंटलचा भाव

एका चाहत्यामुळे गेलेला हेमा मालिनींच्या वडिलांचा जीव; अभिनेत्रीला पाहण्यासाठी घरात घुसला आणि थेट...

SCROLL FOR NEXT